'महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड, मुंबई' वेबसाइट मध्ये आपले स्वागत आहे
सहकारी चळवळीचे यश हे सहकारी संस्थांच्या संख्यात्मक वाढीपेक्षा, सभासदांच्या नैतिकतेवर अधिक अवलंबून असते``
- महात्मा गांधी
भारतात सहकारी चळवळीची पाळेमुळे 1904 साली सापडतात जेव्हा पहिला `सहकारी पतसंस्था कायदा` लागू करण्यात आला.
सहकारी चळवळीच्या अनुषंगाने विचार करता महाराष्ट्र हे देशातील सर्वात विकसित राज्य आहे. महाराष्ट्रात क्वचितच एखादे खेडेगांव असेल ज्याला सहकारी चळवळीचा स्पर्श झाला नाही अथवा महत्वाची आर्थिक घडामोड/उपक्रम असेल ज्याचा सहकारी क्षेत्रात समावेश नाही. महाराष्ट्रामध्ये सहकारी चळवळीचा विकास त्रिस्तरीय रचनेमध्ये झालेला आहे. ज्याच्या अग्रभागी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक), मध्यम स्तरावर जिल्हा बँका (31) व तळाशी प्राथमिक कृषी पतसंस्था (21085) कार्यरत आहेत.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक राज्यातील अतिरिक्त संसाधनांचे समतोल केंद्र म्हणून कार्यरत आहे. ज्याव्दारे ती बहुआयामी विकास व समृध्दीची खात्री देते. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही देशातील सर्वात मोठी राज्य सहकारी बँक आहे. त्याशिवाय `दि बँकर` या लंडनस्थित ख्यातनाम नियतकालिकाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये ही भारतातील एकमेव सहकारी बँक (संस्था) आहे जी 9 वेळा जगातील सर्वोत्कृष्ट 1000 बँकांमध्ये ``आर्थिक स्थैर्याच्या`` (भांडवली पर्याप्तता) निकषावर निवडली गेली आहे.
रिझर्व्ह बँक कायदा 1934 च्या दुसऱया सूचीमध्ये (शेडयूल्ड -II) राज्य बँकेचा समावेश करण्यात आला आहे.
अधिक माहिती »
महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांचे जाळे
अ.क्र
|
दि महाराष्ट्र राज्य सह.बँक लि.,
|
2017-18
|
को-ऑप.क्रेडिट संरचना (महाराष्ट्र राज्य)
|
2017-18
|
1
|
मुख्य कचेरी मुंबई
|
1
|
जिल्हा बँकांची संख्या
|
31
|
2
|
प्रशासकीय कार्यालय, वाशी
|
1
|
जिल्हा बँका शाखा संख्या
|
3667
|
3
|
प्रादेशिक कार्यालये
|
6
|
एकूण पतसंस्था
|
21214
|
4
|
शाखा
|
54
|
पतसंस्था सभासद
|
10927235
|
5
|
विस्तारित कक्ष
|
3
|
कर्जदार सभासद
|
4839106
|
6
|
सीटीएस सर्व्हीस सेंटर्स
|
7
|
नागरी बँका संख्या
|
502
|
7
|
एटीएम सेंटर
|
18
|
नागरी बँका शाखा संख्या
|
5713
|
8
|
मेगा बँकर मशिन
|
4
|
|
|