फोन नंबर @ ०२२ २२८७६०१५ ते २०

Central Financing Agencies Department

महाराष्ट्र राज्यातील सहकारी चळवळ प्रामुख्याने त्रिस्तरीय पतसंरचनेच्या माध्यमाव्दारे कार्यरत आहे. यामध्ये शिखर स्तरावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, जिल्हा स्तरावर जिल्हा मध्यवर्ता सहकारी बँका तर गाव पातळीवर प्राथमिक सहकारी संस्था अशी संरचना आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही राज्यातील जिल्हा मध्यवर्ता सहकारी बँकांचीr शिखर संस्था आहे. राज्य सहकारी बँकेच्या जिल्हा मध्यवर्ता बँका विभागामार्फत, जिल्हा बँकांना राष्ट्रीय बँकेच्या फेरकर्ज पुरवठयाअंतर्गत शेती व बिगरशेती कर्जपुरवठयाचे काम हाताळले जात आहे. राज्यातील शेतक-यांना प्राथमिक सहकारी संस्था व जिल्हा मध्यवर्ता सहकारी बँकांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिले जातात. राज्य सहकारी बँकेच्या प्रादेशिक कार्यालये / पे-ऑफिसेसच्या माध्यमातून कर्ज वितरण केले जात असून विभागामार्फत कर्जपुरवठयावर नियंत्रण ठेवले जाते. जिल्हा मध्यवर्ता बँका विभागामार्फत राष्ट्रीय बँक फेरकर्जासाठी राष्ट्रीय बँक तसेच आवश्यक हमीसाठी शासन यामध्ये दुवा साधण्याची भूमिका पार पाडली जाते.

दृष्टीक्षेपात आकडेवारी (31/03/2018)

 • राज्यातील जिल्हा बँकांची संख्या : 31
 • जिल्हा बँकांच्या शाखांची संख्या : 3667
 • प्राथमिक सहकारी संस्था संख्या : 21214
 • जिल्हा बँकांचा सभासदांची संख्या : 130904

जिल्हा मध्यवर्ता बँका विभागामार्फत केला जाणारा पतपुरवठा व राबविल्या जाणा-या योजनांबाबतची संक्षिप्त माहिती खालीलप्रमाणे.

  अ) कर्जप्रकार :
 • अल्पमुदत (शेती))
 • मध्यम मुदत रपांतर / फेररपांतर / फेरआखणी
 • साखर फेरताबेगहाण.
 • पगारदार नोकरांच्या पतसंस्थांसाठी फेरकर्ज
 • गुंतवणूक स्करपाचे फेरकर्ज (शेती, शेतीपुरक व बिगरशेती)
 • वेज अॅन्ड मिन्स् फेरकर्ज
 • Direct refinance to PACS
  ब) योजना :
 • केंद्र / राज्य शासन पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी
 • प्रो. वैद्यनाथन समिती शिफारशींची अंमलबजावणी
 • प्रो. वैद्यनाथन समिती शिफारशींची अंमलबजावणी
 • जिल्हा मध्यवर्ता सहकारी बँकांचे क्रिसील मॉडयुलप्रमाणे रेटिंग.

नागरी बँका विभाग

नागरी बँकांना कर्जपुरवठा करणे हा या विभागाचा मुख्य उद्देश आहे. नागरी बँकांकडून घेतलेल्या ठेवीतून, राज्य सह. बँक, नागरी सह. बँकांच्या चल/अचल संपत्तीवर नजरगहाण व ताबेगहाण तसेच सोने तारण गहारणात घेवून कर्ज पुरवठा करत आहे.

  नागरी बँकांना खालील प्रमाणे सुविधा पुरविल्या जातात.
 • राज्य सह. बँक आपल्या सभासद बँकांना स्वनिधीतून कॅश क्रेडिट मर्यादा मंजूर केल्या जातात. (अथकित तारणपत्रके)
 • नागरी बँकांना इमारतीसाठी व खरेदीसाठी किंवा त्यांच्या मुख्य कचेरीच्या बांधकामासाठी त्यांना कर्जपुरवठा केला जातो.
 • नागरी बँकांचे मुख्य कचेरी व शाखांना संगणकीकरणासाठी मध्यम मुदती कर्ज दिले जाते.
 • आयात / निर्यात व्यवसायांच्या सुविधासाठी आमचे आयबीडी विभागातून सुविधा पुरविल्या जातात.
 • मुदत ठेवीतूनच त्यांना अधिकर्ष मर्यादा मंजूर केली जाते.
 • राज्य बँकेच्या ट्रेझरी विभागातून नागरी बँकांना बऱयाचशा सुविधा पुरविल्या जातात. तसेच गव्हर्नमेंट सिक्युरिटीजचे खरेदी व विक्री , सीएसजीएल खाते उघडण्यासाठी सुध्दा.
 • आरटीजीएस विभागातर्फे अर्बन बँकांचे फंडस् ट्रान्सफर केले जातात.
 • नॅशनल हौसिंग बँक फेरकर्ज पुरवठा.

शिखर बँकेच्या नागरी सह. बँका विभागाकडून राज्यातील नागरी सह. बँकांसाठी बँकिंग विषयक महत्वपूर्ण असणारी माहिती व मार्गदर्शन वेळोवेळी करण्यात येते. तसेच या विभागाकडून नागरी सह. बँकांची सांख्यकीय व जनरल माहिती एकत्र करुन त्या माहितीचे परिपत्रक आपल्या सदस्य नागरी सहकारी बँकांना देण्याचे काम करत असते.

दृष्टीक्षेपातील नागरी बँकांची आकडेवारी दि.31.03.2017 अखेर.
 • राज्यातील नागरी बँकांची एकूण संख्या 502
 • राज्यातील नागरी बँकांची शाखांची संख्या 5713 (अंदाजित)