राज्य बँकेच्या कृषी औद्योगिक विभागामार्फत खाजगी / सहकारी साखर कारखाने, प्रक्रिया
/ पणन संस्था तसेच अन्य सहकारी संस्थांना थेट कर्ज पुरवठा केला जातो. सदर संस्थांबरोबरच
राज्य पातळीवरील महावितरण, आदिवासी विकास महामंडळ या संस्था तसेच देश पातळीवरील एफ.सी.आय.
भारतीय अन्न महामंडळ व इफको यांनाही कर्ज पुरवठा केला जातो.
खाजगी / सहकारी साखर कारखाने तसेच सूत गिरण्यांच्या उभारणी विस्तारीकरण, आधुनिकीकरणासाठीच्या
मुदती कर्ज पुरवठयाबरोबरच कारखान्याच्या सहविज निर्मिती प्रकल्प, सौर उर्जा प्रकल्प
व डिस्टलीरी प्रकल्प उभारणीसाठी, त्याचबरोबर नवीन प्रकल्प उभारणीसाठी ग्रीनफील्ड अंतर्गत
5ते 7 वर्ष मुदतीने मुदती कर्ज पुरवठा केला जातो.
संस्थेच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी खळते भांडवली कर्ज पुरवठा केला जात असून, सदरील
कर्जाचे वितरण प्रादेशिक कार्यालयामार्फत होते. कर्ज व्यवहारावर प्रभावी नियंत्रण राहण्याच्या
दृष्टीने मंजूर कर्जाचा विनियोग, कर्ज खात्यावरील व्यवहार व अन्य महत्वाच्या बाबींबाबत
संबंधित प्रादेशिक कार्यालयाकडून अहवाल मागविला जातो. उत्पादनात असणाöया संस्थांकडील
मालसाठा पत्रके तपासणी अहवाल तसेच ताबेगहाण व नजरगहाण मालसाठयावर नियंत्रण ठेवून योग्य
किंमतीचे तारण नियमित राहणाöयासाठी बँकेमार्फत वर्षातून एकदा संस्थेस प्रा.का. चे व्यवस्थापकांनी
अचानक भेट देवून मालसाठयाची तपासणी करावयाची आहे आणि वर्षातून एकदा शासन नामतालीकेत
नाव समाविष्ट असलेल्या सनदी लेखापालांकडून नाबार्डच्या निर्देशानुसार बँकेमार्फत स्टॉक
ऑडिट करण्यात येईल.
उपरोक्त सर्व अहवालांचे आधारे कर्ज रकमेचा विनियोग योग्य झाल्याबाबतची खातारजमा करुन
त्याबाबतचा त्रैमासिक आढावा मा. संचालक मंडळास सादर केला जातो.
संस्थांच्या कर्ज मंजूरी अनुषंगाने आवश्यक त्या अटी पुर्ततेसह गहाणखताची कार्यवाहीसुध्दा
हया विभागामार्फत केली जाते.
1) बँकेमार्फत संस्थानिहाय खालील प्रमाणे कर्ज पुरवठा केला जातो.
अ) प्रकल्प उभारणी / विस्तारीकरणासाठी मध्यम मुदत कर्ज पुरवठा :
- साखर उत्पादन
- डिस्टीलरी /ईथॅनॉल निर्मीती
- कारखाना गाळप क्षमतावाढ आणि आधुनिकीकरण
- सहविज निर्मिती
- सौर उर्जा निर्मीती
- कर्ज टेकओव्हर
ब) खेळते भांडवली कर्ज पुरवठा :
- साखर मालतारण
- नजरगहाण (स्टोअर्स /गणीबेल्स)
- डिस्टीलरी इथेनॉल केमिकल
क) हंगामपुर्व तयारीसाठी अल्पमुदत कर्ज
ड) वेळोवेळी शासनाने पुरस्कृत केलेल्या योजना
इ) बँक हमी/ पत पत्र (एल.सी)
- मालतारण कर्ज
1
|
कर्ज मर्यादा
|
खुल्या साखरेचे गत तीन महिन्यातील सरासरी बाजारभाव अथवा साखर मुल्यांकन निश्चित करावयाच्या
fिदवसाचा बाजारभाव या दोहोपैकी कमी असलेल्या दरानुसार बँक मुल्यांकन दर निश्चित करुन
सदर दरानुसार हंगामात शिल्लक राहणाöया संभाव्य कमाल साखर साठयाच्या किंमती इतपत सदर
मर्यादा मंजूर केली जाते.
|
2
|
कालावधी
|
नोव्हेंबर ते ऑक्टोबर (11 महीने )
|
3
|
दुरावा
|
अ) एक वर्षाच्या आतील साखर साठयावर 15%
ब) एक ते दोन वर्षापर्यतच्या साखर साठयावर 20%
क) दोन ते तीन वर्षापर्यतच्या साखर साठयावर 25%
ड) तीन वर्षाच्या पुढील साखर साठा विचारात घेतला जात नाही.
|
4
|
तारण
|
साखर साठा
|
- नजरगहाण कर्ज
1
|
कर्ज मर्यादा
|
नजरगहाण स्टोअर्स व गणी बेल्ससाठी गत तीन हंगामात मंजूर मर्यादा कमाल वापराच्या 120%
अथवा रु.2.00 कोटी या दोहोपैकी किमान असणाöया रकमे इतपत, तर डिस्टीलरी, इथेनॉल, केमिकल्स
इत्यादीसाठीच्या मंजूर मर्यादा कमाल वापराच्या 110% इतपत
|
2
|
दुरावा
|
40%
|
3
|
कालावधी
|
नोव्हेंबर ते ऑक्टोबर (11 महीने)
|
4
|
तारण
|
स्टोअर्स गणीबेल्स मालाचा साठा तसेच पुरक उद्योगातील कच्चा तसेच पक्का माल
|
- अल्पमुदत कर्ज
1
|
कर्ज कारण
|
बिगर हंगामातील खर्च भागविणेसाठी (मशिनरी देखभाल दुरुस्ती व तोडणी वाहतूक यंत्रणा उभारणी
इत्यादि )
|
2
|
कर्ज मर्यादा
|
गाळप घ्यावयाच्या हंगामातील अपेक्षित साखर उत्पादनावर रु.200/ö प्रति क्विंटल टॅगिंगनुसार
होणारी रक्कम अथवा बिगर हंगामातील कॅश फ्लोमध्ये दाखवलेली तुट या दोहोपैकी कमी असलेल्या
रकमेइतपत.
|
3
|
कालावधी
|
9 ते 10 महीने (30 जुन पर्यत)
|
4
|
तारण
|
कारखान्याचे चल / अचल मालमत्तेवर फ्लोटींग चार्ज करुन घेऊन.
|
- मध्यम मुदत
1
|
कर्ज कारण
|
साखर कारखाना, सहविज निर्मिती प्रकल्प, डिस्टीलरी उभारणी / विस्तारीकरण / आधुनिकीकरण
|
2
|
मर्यादाः अ) सहकारी
|
को.जन प्रकल्प किंमतीच्या 60% आणि आधुनिकीकरण, डिस्टीलरी व इथेनॉल प्रकल्प किंमतीच्या
50%
|
|
ब) खाजगी
|
को.जन प्रकल्प किंमतीच्या 55% आणि आधुनिकीकरण डिस्टीलरी व इथेनॉल प्रकल्प किंमतीच्या
45%
|
|
क) ग्रीन फिल्ड प्रोजेक्ट
|
प्रकल्प किंमतीच्या 45% पर्यत नविन कारखाना, सहविज प्रकल्प उभारणी आणि डिस्टीलरी, इथेनॉल
प्रकल्प उभारणी इत्यादीसाठी.
|
3
|
परतफेड कालावधी
|
7 वर्ष ( 2 वर्ष सवलतीच्या कालावधीसह)
|
4
|
तारण
|
संस्थेच्या सद्याच्या व भविष्यात निर्माण होणाöया संपुर्ण स्थावर मालमत्तेचे इंग्लिश
गहाणखत आणि मा. संचालक मंडळ सदस्स्यांचा वैयक्तिक व सामुहिक जबाबदारीचा कर्ज परतफेडीचा
हमी बाँण्ड
|
- साखर मुल्यांकन
रिझर्व्ह बँकेच्या दि.01.07.1996 च्या मार्गदर्शक तत्वानुसार साखरेचा मुल्यांकन आणि
उचलदर निश्चित केला जातो. त्यानुसार दरमहा एक तारखेस साखर दराचाआढावा घेवून त्यानुसार
मुल्यांकन दरात वाढ/घट करण्याचा निर्णय प्रशासकीय पातळीवर घेण्यात येतो.
साखर मुल्यांकन दरात ज्या दिवशी बदल करण्याचा आहे त्या दिवसाचा साखर संघाकडून प्राप्त
करविरहित दर किंवा मागील तीन महिन्यातील सरासरी साखर दर या पैकी कमी असलेला दर मुल्यांकन
दर म्हणून निश्चित केला जातो. त्यावर 15% दुरावा ठेवून उचलदर निश्चित केला जातो. बँकेने
मंजूर केलेल्या कर्जासाठी रु.500/- प्रति क्विंटल टॅगिंग व रु.250/- कारखान्यास प्रक्रीया
खर्चासाठी असे एकूण रु.750/- प्रति क्विंटल कपात करुन उर्वरीत रक्कम कारखान्यास उढसबील
अदा करणेसाठी उपलब्ध करुन दिली जाते.